मुंबई : (Uddhav Thackrey On Gopinath Munde) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी समाजवादी पक्षासोबत युतीची घोषणा केली . यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी दिवांगत नेते गोपिनाथ मुंडे यांचाही उल्लेख करत, त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेने त्यांना कसं निवडूण दिलं तो किस्सा सांगितला. यावेळी बोवताना ‘करुन दाखवलं ‘ या उद्धव ठाकरेंच्या एका शब्दामुळे महापालिकेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांचा कसा पराभव झाला, हे त्यांनी सांगितलं.
याबद्दल अधिक माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “जेव्हा २०१२मध्ये आम्ही महापालिका लढवत होतो, तेव्हा आमची युती झाली होती.तेव्हा गोपीनाथ मुंडे माझ्याकडं आले म्हणाले की काय करायच आपल्याकडे नविन काहीच नाही. कसं करायच. त्यावेळी विरोधात पृथ्वीराज चव्हाण होते. ते म्हणाले होते की या निवडणुकीनंतर शिवसेना दिसणारच नाही. त्यावेळी असं वातावरण होत की काय करायच.”
पुढे ठाकरे म्हणाले की,” तेव्हा एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरच जिंकलो. त्यावेळी आम्ही फोटोही लावले होते. तो शब्द म्हणजे करुन दाखवलं. मुंबत मागच्या ५ वर्षात झालेली काम होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली त्यावेळी लोक म्हणाली की हे काम यांनी केलय. त्या एका करुन दाखवले या शब्दाने विरोधकांचा सुपडा साफ करुन टाकला. “