लंडन : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे एका कार्यक्रमात भारतातल्या केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी भारताची तुलना पाकिस्तानशी करत पंतप्रधान मोदी कोणाचंच ऐकत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत ते बोलत होते.
आयडिया ऑफ इंडिया असा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात राहुल गांधींनी बोलत होते, ते म्हणाले भारतात माध्यमं एक बाजू घेऊन काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचंच ऐकत नाहीत. देशातली लोकशाही धोक्यात आहे, कारण संविधानिक मूल्यांवरती सातत्याने हल्ले होत आहेत. असं ते म्हणाले.
राहुल गांधी पुढं म्हणाले, भाजपाने संपूर्ण देशात केरोसिन पसरवलंय. राज्यांची अंडी विरोधी पक्षांची शक्ती कमी करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर केलं अजात आहे. भारताचा आवाज एका विचारधारेने मारून टाकला आहे. भारत आणि चीन संबंधात बोलताना राहुल गांधी म्हणाले, लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती आहे. चीन सीमाभागात विकासकामं करतंय आणि पंतप्रधान मोदी चीनचं नावही घ्यायला तयार नाहीयेत. त्यांच्या य अवक्तव्यांनंतर राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाला कमी लेखल्याचंही भाजपाने म्हटलं आहे.