उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अटकेत, 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | Amravati Murder Case – व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अमरावती पोलिसांनी मुख्य आरोपी इमरान शेखला न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने इरफान शेखला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला पोलिसांनी शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या होत्या. तसंच त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

इरफान शेखला अमरावती पोलिसांनी कोर्टात हजर करताना आपली बाजू मांडली. या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख याची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला त्याची कस्टडी मिळाली, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणात पैशाचा काही प्रकार आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहे. इरफान शेख ज्या रहबरिया  एनजीओचा सदस्य होता, त्याची बँक डिटेल्स पोलीस एकत्र करत आहेत.  दरम्यान, इरफान शेख याच्याकडे येणाऱ्या पैशांची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करावी लागेल, त्यामुळे त्याची कस्टडी आम्हाला मिळावी, असा युक्तीवाद पोलिसांनी कोर्टात केला आहे.

दरम्यान, व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणातील दुचाकीही पोलिसांनी अद्याप मिळालेली नाही. त्याशिवाय, पोलीस एका कारचाही शोध घेत आहे, या कारचा वापर हत्यानंतर फरार होण्यासाठी करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आरोपी इरफान शेख याच्या वकिलानेही कोर्टात युक्तीवाद केला. ते म्हणाले की, व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली तेव्हा इरफान शेख तिथे उपस्थित नव्हता. बँक खात्याच्या तपशीलासाठी पोलीस बँकेकडून एक कॉपी घेऊ शकते, त्यामुळे आरोपीला पोलिसी कस्टडची गरज नाही. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर कोर्टाने इरफान शेख याला सात जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. 

Sumitra nalawade: