पुण्यात अनधिकृत शाळांचे फुटले पेव!

पुण्यातल्या २२ शाळांना मान्यताच नाही

पुणे : राज्यात सध्या अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, पुणेही त्यात मागे नाही. राज्यभरात ६७४ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यातील २२ शाळा या पुण्यातील आहेत. या अनधिकृत शाळांवर आता कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होत आहे. या शाळांची नावे जाहीर करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कोणत्याही भौतिक सुविधा नसल्याने दुसर्‍या ठिकाणी राज्य मंडळाची बारावीची परीक्षा घेणार्‍या १४ शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच केली जाणार आहे. काही संस्थाचालकांनी शासनाच्या नियम-अटींचे पालन केले आहे, मात्र परवानगी नाही. त्यामुळे अशा शाळांवर काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंद यू डायसवर केली जाते. विद्यार्थ्याच्या आधारकार्डची माहिती संकेतस्थळावर भरली जाते. त्यादरम्यान परवानगी मिळालेली नसतानाही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अशा शाळांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. हा दंंड १० लाख रुपये प्रतिदिवस इतका असावा, असे आदेश आहेत.

Dnyaneshwar: