‘…तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहील’- अजित पवार

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून त्यांच्यावर सतत टीका केली जात आहे. भाजपाने राज्य सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप देखील केले होते. यातूनच हे सरकार कधी पडेल याचे मुहूर्त देण्यात येत होते. आता यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“राज्यात ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते हे लोकशाहीतलं सत्य आहे. हे सरकार आल्यापासून कुणी म्हटलं ३ महिन्यात जाईल, ६ महिन्यात जाईल, ९ महिन्यात जाईल, १२ महिन्यात जाईल असं करत करत आता अडीच वर्ष झाले. आता त्यांना जर काही माहिती असेल, तर मला त्याबद्दल काही माहिती नाही”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला.

सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहील”, असंही पवार म्हणाले.

Sumitra nalawade: