UPI पेमेंट वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून भरावा लागणार शुल्क

UPI Payment : आज 10 रुपयासाठी सुद्धा आपण प्रत्येक जण UPI पेमेंटचा वापर करतो. मोठ्या दुकानांपासून ते चहाच्या टपरीवरही UPI वापर केला जातो. अशातच UPI पेमेंट चा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी मोठी बातमी आहे. UPI पेमेंटसाठी आता तुमचा खिसा खाली होईल. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यास 1 एप्रिलपासून शुल्क लागणार आहे.

भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI च्या माध्यमातून मर्चंट ट्रान्झॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क आकारण्याची सूचना केल आहे. अधिसूचनेनुसार, 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून वसूल करण्यात येणार आहे.

बिझनेस स्टँडर्डने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स शुल्क व्यवहारांवर लागू आहे. UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून घेण्यात येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने अधिसूचनेत, या नवीन बदलाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्वी हा आढावा घेण्यात येईल, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.

Dnyaneshwar: