UPSC Result | भारतीय प्रशासकीय सेवा (UPSC) २०२१ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा फायनल निकाल (upsc mains 2021 result) सोमवारी (दि. 30) लागला आहे. युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in) हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्वागतार्ह बाब म्हणजे यावर्षी पहिल्या पाच टॉपर विद्यार्थ्यांमध्ये चार मुलींनी (girls topers) बाजी मारली आहे. त्यांत पहिल्या क्रमांकावर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थिनी श्रुती शर्माने झेंडा रोवला आहे. (shruti sharma)
दरम्यान परीक्षेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून (pm narendra modi twitt) अभिनंदन केले आहे. आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना, भारताच्या विकासाच्या प्रवासाच्या महत्त्वाच्या वेळी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या तरुणांना माझ्या शुभेच्छा. असे ट्विट त्यांनी केले आहे. (azadi ka amrut mohotsaw)
सदर निकालात शीर्षस्थानी असलेले 10 विद्यार्थी : श्रुति शर्मा, अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्य वर्मा, उत्कर्ष द्विवेदी, यक्ष चौधरी, सम्यक एस जैन, इशिता राठी, प्रीतम कुमार, हरकीरत सिंह रंधावा अशी अनुक्रमे टॉपर विद्यार्थी आहेत. upscची अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in सदर निकाल बघता येईल.