मुंबई | Urfi Javed – बाॅलिवूड अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अनोख्या फॅशन स्टाईलमुळे ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तसंच ती तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. आताही उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीला तिच्या कपड्यांच्या विचित्र स्टाईलमुळे एका मुंबईतील रेस्टाॅरंटमध्ये प्रवेश दिला गेला नाहीये. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फीला तिच्या कपड्यांमुळे एका रेस्टाॅरंटमध्ये प्रवेश नाकारला असून त्यावर तिनं तिचा संताप व्यक्त केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ विरल भयानीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये उर्फीला रेस्टाॅरंटमधील एक व्यक्ती प्रवेश करण्यास नकार देत असल्याचं दिसत आहे. तेव्हा उर्फी त्या व्यक्तीवर भडकते, तसंच यावेळी उर्फीनं त्या व्यक्तीला धमकी देखील दिली आहे.
रेस्टॅारंटमधील व्यक्ती उर्फीला सध्या एकही जागा शिल्लक नसल्याने तुम्ही जाऊ शकत नाही असं सांगतो. त्यावर उर्फी त्याच्यावर संतापते. मी उर्फी जावेद आहे. उर्फीचं नाव जरी ऐकलं तरी जागा रिकामी होते. मला माहिती आहे तुम्ही माझ्या कपड्यांमुळे माझ्याशी असं वागत आहात. आता तुम्ही बघ, मी तुमच्या विरोधात ट्विट करून तुम्हाला दाखवून देईन, अशी धमकी उर्फी त्या व्यक्तीला देते. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या प्रकारानंतर उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिनं लिहिलं आहे की, “मुंबई, खरंच 21वे शतक आहे का? मला आज रेस्टाॅरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. माझी फॅशन तुम्हाला आवडत नसेल तर ठीक आहे, पण त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं वागणं योग्य नाही. जर तुम्ही तसं केलं असेल तर ते स्वीकारा. खोटी कारणं देऊ नका.” उर्फीनं ही स्टोरी शेअर करत Zomato ला टॅग केलं आहे.