“माझ्या चारित्र्यावर बोट उचललं ते विसरलीस का?”; म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरून उर्फीनं चित्रा वाघ यांना डीवचलं

मुंबई | Urfi Javed On Chitra Wagh – अभिनेत्री आणि माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. या दोघींमध्ये झालेल्या वादाची दोन महिन्यांपूर्वी जोरदार चर्चा झाली होती. हा वाद थंडावत असतानाच आता पुन्हा एकदा या दोघींमध्ये नवीन वादाची ठिणगी पडली आहे. याचं कारण म्हणजे शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हायरल व्हिडीओ. शीतल म्हात्रेंच्या या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरून उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

शीतल म्हात्रे प्रकरणावर चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ संदेश ट्विट केला आहे. “शीतल (म्हात्रे)….तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादीत नाहीच. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे की या हरामखोरांना सोडू नकाच. पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या या ट्विटवर उर्फी जावदनं टीका केली आहे. तिनं ट्विट करत म्हटलं आहे की, “अपना टाईम भूल गई, जब मेरे कपडों की वजह से मेरे कॅरेक्टर पे उंगली उठा रही थी. मुझे जेल भेजने की मांग कर रही थी. खुलेआम मेरा सर फोडने की धमकी दी थी. व्वा व्वा व्वा. कोई इस औरत को बताओ की हिपोक्रसी की भी सीमा होती है” असं उर्फीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sumitra nalawade: