मुंबई | Urfi Javed On Chitra Wagh – गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना पत्रही दिलं आहे. तसंच, उर्फीनं असाच नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला होता.
“उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, तिचं थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यावर आता उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघ यांना खोचक टोला लगावला आहे.
उर्फीनं नुकताच एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत तिनं चित्रा वाघ यांना टॅग केलं आहे. तसंच तिनं हा फोटो ट्विट करत म्हटलं आहे की “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.”
तर उर्फीनं आणखी एक ट्विट करत म्हटलं आहे की, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” असं म्हणत उर्फीनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.