उर्फीनं बोल्डनेसची हद्दच केली पार, तिचा अनोखा ड्रेस पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

मुंबई | Urfi Javed – उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. ती कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसाच नाही. उर्फी तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे बऱ्याचदा वादात देखील अडकली आहे. तसंच आताही तिनं एक अनोखी फॅशन केली आहे. तिची ही फॅशन पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

उर्फी दररोज अतरंगी स्वरूपाचे कपडे घालत असते. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील होते. आत्तापर्यंत उर्फीनं लोखंडी साखळी, घड्याळ, ब्लेड, पोतं, इलेक्ट्रिक वायर अशा अनेक वस्तूंचा वापर केलेले अनोखे ड्रेस घातले आहेत. मात्र, आता तर उर्फीनं बोल्डनेसची हद्दच पार केली आहे. तिच्या आत्ताच्या अनोख्या ड्रेसचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. 

उर्फीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं दोन मोबाईलचा वापर करत फॅशन केल्याचं दिसत आहे. तिनं मोबाईल आणि चार्जरच्या वायरचा एक ड्रेस घातला आहे. त्यावर तिनं ब्ल्यू कलरचं ब्लेझर आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट घातली आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत उर्फीनं कॅप्शनमध्ये “fully charged” असं लिहिलं आहे. उर्फीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Sumitra nalawade: