मुंबई | Urfi Javed On Ranbir Kapoor – अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अनोख्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती दररोज अतरंगी ड्रेस घालत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या ड्रेसिंग स्टाईलची चर्चा सुरू असते. उर्फीच्या या ड्रेसिंग स्टाईलमुळे काहीजण तिचं कौतुक करतात तर काहीजण तिला ट्रोल करतात. अशातच काही दिवसांपूर्वी बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खाननं (Kareena Kapoor Khan) उर्फीचं कौतुक केलं होतं. तर अभिनेता रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) एका मुलाखतीदरम्यान उर्फीच्या फॅशन स्टाईलवर वाईट कमेंट केली होती. त्याला आता उर्फीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
रणबीर कपूरला एका मुलाखतीदरम्यान उर्फीच्या फॅशन सेन्सबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, तिचा फॅशन सेन्स म्हणजे बॅड टेस्ट. यावर आता उर्फीनं रणबीरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
उर्फी म्हणाली की, “रणबीर कपूरनं केलेलं स्टेटमेंट ऐकून मला वाईट वाटलं. पण जेव्हा करीना कपूरनं माझी प्रशंसा केली तेव्हा वाटलं की रणबीरला कोण विचारणारे. करिनानं माझं कौतुक केलं आहे त्यामुळे आता रणबीरची काय लायकी आहे?”
दरम्यान, रणबीरनं करीना कपूरच्या ‘व्हाॅट वुमन वाॅन्ट’ या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला एका खेळादरम्यान उर्फी जावेदबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यानं तिच्यावर टीका केली होती.