“ब्रेकअप झालंय? अबोला धरलाय? त्रास होतोय ना मग…”, उर्मिला कोठारेनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | Urmila Kothare – मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील उर्मिलानं एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं ब्रेकअप झाल्यावर काय करावं हे सांगितलं आहे. तसंच तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

उर्मिलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील पोस्ट केलं. या रीलला तिनं खास कॅप्शन देखील दिलं आहे. तिने लिहीलं आहे की, “ब्रेकअप झालंय ? अबोला धरलाय ? आठवण येतेय खूप ? त्रास होतोय ना..! कानात हेडफोन्स घाला आणि फक्त फिल करा…” उर्मिलाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.

उर्मिलानं ही पोस्ट शेअर करण्यामागचं कारण म्हणजे लवकरच तिचा ‘ऑटोग्राफ’ (Autograph) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘अधुरे-अधुरे’ (Adhure Adhure) असं या गाण्याचं नाव आहे. उर्मिलानं हे गाणं या रीलमधून सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

दरम्यान, ‘ऑटोग्राफ’ या चित्रपटात उर्मिला कोठारेसोबत अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि मानसी मोघे (Manasi Moghe) स्क्रीन शेअर करणार आहेत. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक सतीश राजवाडेनं (Satish Rajwade) केलं आहे. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Sumitra nalawade: