पाकिस्तानी क्रिकेटपटूला उर्वशीने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “ऋषभ पंत…”

मुंबई | अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ही तिच्या कामामुळे कमी तर तिच्या सोशल मिडियाच्या पोस्टमुळे चर्चेत असते. तिला अनेकदा भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत या नावानंही छेडलं जातं. यामुळेच ती जास्त चर्चेत असते. पण आज उर्वशी रौतेला वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. उर्वशीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने दिलेल्या शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकरी उर्वशीच्या शुभेच्छा मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहचा 15 फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्याने त्याचा वाढदिवस क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या सहकाऱ्यांबरोबर साजरा केला. नसीमने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली, त्यावेळी उर्वशी रौतेलाने कमेंट सेक्शनमध्ये त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बलुचिस्तान पोलिसांकडून मानद डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनेत्रीने नसीमचे अभिनंदन केले. उर्वशीने ट्विटरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचे अभिनंदन केले आणि लिहिलं, “वाढदिवसाच्या शुभेच्छा नसीम शाह. डीएसपी पद मिळाल्याबद्दल अभिनंदन.” त्याचवेळी नसीमनेही उर्वशीच्या कमेंटला ‘धन्यवाद’ लिहून उत्तर दिलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलच घेरलं आहे.

Dnyaneshwar: