सार्वजनिक वाहतूकसाठी इलेक्ट्रीक बसचा वापर

पुणे शहर सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्ड्सने सन्मानित

पुणे : पुणे शहराला सन 2022 चा C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्ड्सचे विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. पुणे शहराने इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरात असल्याबद्दल पुणे शहराला पुरस्कार जाहीर केला. जागतिक तापमान वाढीवर विविध देशातील शहरांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची दखल घेत पुरस्कार देण्यात आले आहे.

यावर्षीच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जगातील सत्तर शहरांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या पुरस्कारांमुळे विविध शहरांनी पुढाकार घेऊन वातावरणबदला विरुद्ध लढा देण्यासाठी शहरानी केलेले उपाययोजनांचे मैत्रीपूर्ण स्पर्धांच्या स्वरुपात चयन करण्यात आले. अशा पुरस्कार कार्यक्रमांच्या मागील सात आवृत्यांनी जगातील सर्वात महत्वाकांक्षी हवामान प्रकल्पांपैकी काही चांगले प्रकल्प समोर आले आहे.

सन २०२२ मध्ये पुणे शहराला प्राप्त झालेल्या या पुरस्कारातून क्लायमेट ॲक्शन बद्दल शहराने अवलंबलेल्या स्मार्ट, क्रिएटिव्ह योजना यांचे एक उदाहरण जगातील इतर शहरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. पुणे शहराने नावीन्यपूर्ण सर्वसमावेशक व रिझिलियन्स भविष्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे व यासाठी पुणे शहराकडे एक चम्पियन म्हणून बघितले जात आहे.

लंडनचे महापौर सिटीज सादिक खान म्हणाले की, सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅवार्डसच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन, हवामान बदल या विषयावर काम करण्यासाठी शहराची भूमिका महत्त्वाची असते. ही शहरे जगभरातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचे प्रतिनिधीत्व करतात. शहराची भूमिका त्यांनी केलेल्या कृती मधून दिसून येते व काही चांगल्या प्रकल्पांमुळे एका शहराने केलेले चांगले काम जगभरातील नेत्यांना हरित भविष्यात गुंतवणूक करण्यास प्रेरित करेल.”

मायकेल आर. ब्लूमबर्ग, C40 चे अध्यक्ष, UN च्या स्पेशल एन्वाय ओन क्लायमेट अम्बिशन ॲन्ड सोल्युशन्स, C40 बोर्डचे राष्ट्पती, न्यूयॉर्क शहराचे 108 वे महापौर आणि ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीजचे संस्थापक, म्हणाले: “जगभरातील, महापौर आणि शहरे, वातावरण बदल लढ्यावर रणनीती समाईक करण्यासाठी, महत्वाकांक्षी उद्धिष्ट निश्चित करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधातील लढ्यामध्ये आवश्यक असलेला परिणाम मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत.

सिटीज, ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अॅलवार्डसच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर वातवरण बदलसंबंधी केलेल्या कामांची प्रात्यक्षिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शविण्याची संधी मिळाली आहे, व यापुढे भविष्यात होणाऱ्या COP27 मध्ये सुध्दा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Prakash Harale: