टास्क न खेळताही थेट विजेता; एमसी स्टॅन विजेता झाल्याने युजर्स नाराज, निर्मात्यांवर केले गंभीर आरोप

Bigg Boss 16 : बिग बाॅस 16 चा महाअंतिम सोहळा धमाक्यात पार पडला. एमसी स्टॅन हा Bigg Boss 16 चा विजेता झाला असून शिव ठाकरे (Shiv Thakare) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुरूवातीला सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती की, शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी (Priyanka Chahar Choudhary) यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, प्रत्यक्षात सर्व उलटे झाले आणि एमसी स्टॅन हा बिग बाॅग 16 चा विजेता झाला.

एमसी स्टॅन बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यामुळे सोशल मीडियावर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप सातत्याने केले जात आहेत. अनेकांनी थेट बिग बाॅसच्या शोला बायस्ड म्हणून टाकले आहे. प्रियंका चाैधरी किंवा शिव ठाकरे यामधील कुणीतरी बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे अनेकांना वाटत होते. या दोघांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

एमसी स्टॅन हा जरी टास्क करताना दिसला नसला तरीही त्याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. वोट जास्त पडल्यामुळे एमसी स्टॅन हा विजेता झालायं. मात्र, सोशल मीडियावर बिग बाॅस 16 च्या निर्मात्यांच्या विरोधात रोष वाढताना दिसत आहे. एका युजर्सने लिहिले की, प्रियंका चाैधरी ही बाहेर पडल्यानंतर सलमान खान याला देखील खूप वाईट वाटले होते. सलमान खान हा देखील प्रियंका चाैधरी हिला बिग बाॅसच्या विजेता मानतो. दुसऱ्याने लिहिले की, एमसी स्टॅन विजेता झाल्यामुळे शिव ठाकरे याच्यावर अन्याय झाला असून तोच खरा विजेता बिग बाॅस 16 चा आहे. शिव ठाकरे याने आपली मैत्री मनातून निभावली आहे.

Dnyaneshwar: