नवी दिल्ली : (Rishabh Pant Car Accident) शुक्रवारी पहाटे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात (Rishabh Pant Car Accident) झाला होता. नियंत्रण सुटल्याने त्याची कार रस्त्यातील डिव्हायडरला धडकली होती आणि कारने पूर्णपणे पेट घेतला होता. यातून ऋषभ थोडक्यात बचावला. मात्र, मोठ्या प्रमाणात तो जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, अपघात कसा झाला याबात ऋषभने कालच माहिती दिली होती. “गाडी भरधाव वेगात होती, समोर एक मोठा खड्डा असल्याचं दिसल्यानं मी बाजूने घेण्याचा प्रयत्न करत असताना माझे नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. गाडीने दोन तीन पलट्या घेतल्या. मी कसाबसा गाडीतून बाहेर निघलो. तेवढ्यात गाडीचा स्फोट झाला.” अशी माहिती ऋषभने दिली होती.
अपघात झाल्यानंतर गाडी सुरु असताना ऋषभचा डोळा लागला होता त्यामुळे गाडी धडकली. असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. मात्र, आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आणखी एक खुलासा केला आहे. त्यांनी रुग्णालयात जाऊन ऋषभ आणि त्याच्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी ऋषभ सोबत चर्चा देखील केली.
“ऋषभने गाडी चालवताना रस्त्यावर मोठा खड्डा किंवा काळ्या रंगाची काहीतरी वस्तू समोर दिसली असल्याचं सांगितलं. ती वस्तू बघून तो विचलित झाला आणि गाडी बाजूने घेण्याच्या तयारीत ती डिव्हायडरला जाऊन धडकली. असं ऋषभ सोबत चर्चा करताना त्याने सांगितलं आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री धामी यांनी दिली आहे.