नारायण राणेंना मी पराभवाची धूळ चारली, म्हणत वैभव नाईकांचं निलेश राणेंना जाहीर आव्हान!

सिंधुदुर्ग : (Vaibhav Naik On Nilesh Rane) कोकणात राणे कुटुंब विरुद्ध नाईक कुटुंब यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. नारायण राणेंसोबतच निलेश आणि नितेश राणे यांनीही सातत्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर वैभव नाईक यांच्यावर राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंना जाहीर आव्हान दिलं आहे. तसेच, नारायण राणेंचा उल्लेख करत त्यांनाही मी पराभवाची धूळ चारली आहे, असं वैभव नाईक म्हणाले.

वैभव नाईक हे शिंदे सरकारचे मिंधे असून त्यांच्यावर टीका करत नाहीत, असं निलेश राणे म्हणाले होते. यावर नाईक म्हणाले, “निलेश राणेंना हे माहिती नाही की त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी दबावाखाली येऊन किती पक्ष बदलले. काँग्रेसचं सरकार होतं तर तिथे गेले, शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा शिवसेनेत होते. आज भाजपचं सरकार आहे तर भाजपमध्ये आहेत. उद्या दुसरं सरकार येईल, तेव्हा तिकडे जाणार. आम्ही मात्र कुणाचेही मिंधे नाहीत”, असं वैभव नाईक म्हणाले.

निलेश राणेंना निवडणूक लढण्यासाठी भाजप तिकीट देणार नाही, याची खात्री आहे. “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, की तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही खरंच राणे असाल, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा. माझ्यासमोर तुमची निवडणुकीत उभं राहण्याची हिंमत होणार नाही. त्यांच्या वडिलांनाही मी एकदा धूळ चारलेली आहे म्हणत त्यांनी जुन्या पराभवाची राणे कुटुंबाला वैभव नाईकांनी जाणीव करुन दिली आहे.

Prakash Harale: