व्हॅलेंटाईन डे स्पेशल! गूगलच्या डूडलला नेमकं म्हणायचंय काय? पाहा ‘व्हॅलेंटाईन डे’चा इतिहास

Valentine’s day 2023 : आज 14 फेब्रुवारी (14th February) जगभरात हा दिवस व्हॅलेंटाईन डे (Valentine’s day) म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सर्वजण (Lovers) आपल्या प्रिय व्यक्तीला वेगवेगळे गिफ्ट देतात, कायम सोबतीचे वचन देतात सोबतच आपण किती प्रेम करतो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भावना आज प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीजवर मांडतात. अशाप्रकारे वर्षभरातील सर्वात रोमँटिक (Romantic Day of the year) समजला जाणारा 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. (14th February, Valentine’s Day 2023)

दरम्यान, गूगलचे डूडल (Valentine’s Day special Doodle) कायम चर्चेत असते. हमखास काहीतरी चांगला संदेश देणारे असते. अशात आता ‘व्हॅलेंटाईन डे’ला शुभेच्छा देणारं गूगलचं डूडल (Google’s doodle) देखील चर्चेत आहे. 2023 च्या व्हॅलेंटाईन डे च्या डूडलमध्ये खिडकीच्या काचेवरून पाण्याचे दोन थेंब एकत्र येताना दिसत आहेत. आजूबाजूला अनेक थेंब आहेत मात्र, हे दोनच थेंब एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकटेपणा वाटत असताना किंवा एकजण अडचणीत असताना दुसरा थेंब त्याला येऊन भेटतो आणि दोघांचाही एकटेपणा दूर होऊन दोघेही आनंदी दिसतात. आणि त्यांचा प्रवास पुढे सुरू राहतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा समजला जातो. त्यामुळे या डूडलमध्ये पाठीमागे गुलाबी रंगाचे बॅकग्राऊंड दिसते. (Valentine’s day special Google’s doodles Explanation)

https://www.google.com/doodles/valentines-day-2023

या डूडलच्या कॅप्शन मध्येही खूप छान मायना देण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘Rain or Shine, will you be Mine’ असे लिहिलेले आहे. याचा शब्दशः अर्थ जरी ‘सर्व ऋतूंत तू माझी किंवा माझा होशील का?’ असा असला तरी याचा अर्थ ‘सुखात आणि दुःखात कायमची/चा माझी / माझा होशील का?’ असाही होतो.

काय आहे व्हॅलेंटाईन डे? What is valentine’s day?

मध्ययुगात रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं समजत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा.

तेव्हा तेथील संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट ‘युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

Dnyaneshwar: