तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझान खानला जामीन मंजूर

Tunisha Sharma Suicide : छोट्या पडद्यावरील मालिका ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ ची अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून तिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान खान (Sheezan Khan) अटकेत होता. पण आता तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा शनिवारी जामीन मंजूर झाला आहे. आत्महत्या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर अभिनेत्याला जवळपास अडीच महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. 2 फेब्रुवारी रोजी वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादनंतर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे.

शनिवारी दुपारी 2 नंतर निकालाची कॉपी मिळाल्यानंतरच शिझानला कोणत्या अटी नियमानुसार जामीन मंजूर झाला हे कळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. शिझान गेल्या अडीच महिन्यापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

Dnyaneshwar: