मनसेच्या कार्यक्रम पत्रिकेतुन वसंत मोरेचे नाव गायब; मोरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

पुणे : आज पुण्यात मनसे कार्येकर्त्यांचा मेळावा होणार आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. कार्यक्रमातून नाव वगळण्यात आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रात्री उशीरा माझ्या हातात कार्यक्रम पत्रिका आली. या कार्यक्रम पत्रिकेत ११ जणांची कोअर कमिटी आहे पण प्रत्यक्षात १० जणांची नावं आहेत त्यामध्ये माझं नाव नाही. त्यामुळे मी या मेळ्याव्याला जाणार का नाही याचा निर्णय अजून घेतला नाही. असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, हा विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे. यासाठी अशा गोष्टी मुद्दाम केल्या जात आहेत. अशा शब्दांत आपला रोष व्यक्त करत ते म्हणाले की, ही गोष्ट अजून मी शहरातील सिनिअर लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. असं म्हणत त्यांनी शहरातील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Prakash Harale: