प्रत्येकाला दररोज घरचे जेवण जेवून कंटाळा येतो. मग एखाद्या सुटीच्या दिवशी किंवा एखादा चमचमीत पदार्थ खाण्याची चव सुटली, की खवय्ये एखाद्या प्रसिद्ध हॅाटेलच्या शोधात असतात. तसेच नॉनव्हेज म्हटले, की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतेच. मग त्यामध्ये चिकन, मटण किंवा मच्छी असो या पदार्थांचे नाव जरी घेतले तरी नॉनव्हेजप्रेमींना या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहवत नाही.
सोबतच व्हेजप्रेमीदेखील वेगवेगळ्या चवीष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर एखाद्या चांगल्या हॅाटेलच्या शोधात असतात, तर अशाच व्हेज आणि नॉनव्हेजप्रेमींसाठी नव्याने सुरू झालेले “हॅाटेल जगदंब” प्रसिद्ध आहे. मालक अमित कदम यांचे हे हॅाटेल कोठारी बॅाल्कस रोड, अर्चना चिकन शॅापजवळ बिबवेवाडी, पुणे- ३७ येथे आहे. विशेष म्हणजे हे हॅाटेल कमी कालावधीत सर्वांच्या पसंतीचे हॅाटेल बनले आहे.
विशेष म्हणजे “हॅाटेल जगदंब” मध्ये येणार्या खवय्यांकडून तेथील पदार्थांचे होणारे कौतुक आणि झणझणीत पदार्थांची चव हीच तर त्यांची खासियत आहे. तसेच या हॅाटेलमध्ये येणारा प्रत्येक खवय्या हा पदार्थाची चव चाखून खुश तर होतोच, पण तिथले आदरातिथ्य त्यांना हॅाटेल जगदंबमध्ये पुन्हा -पुन्हा यायला भाग पाडते. तसेच या हॅाटेलची स्पे. चिकन थाळी, स्पे. मटण थाळी, स्पे. फिश थाळी, स्पे. कोंकणी कोंबडी वडे, स्पे. मटण दम बिर्याणी, स्पे. चिकन दम बिर्याणी, चिकन लॅालिपॅाप अनेक पदार्थ त्यांची स्पेशालिटी आहेत.
सोबतच या हॅाटेलमध्ये स्पे. व्हेज थाळी, पनीर मसाला, पनीर टिक्का, आलु मटर, व्हेज कोल्हापुरी, दाल तडका, व्हेज बिर्याणी यांसारखे स्वादिष्ट व्हेज पदार्थदेखील मिळतात. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना परवडेल, या दरात अत्यंत रुचकर आणि चवीष्ट असे जेवण हॅाटेल जगदंबमध्ये मिळते. त्यामुळे या हॅाटेलमध्ये खवय्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते. अत्यंत शुद्ध आणि दर्जेदार मसाले, कायम ताजे आणि शुद्ध नॉनव्हेज वापरून बनवलेले पदार्थ खाऊन तेथे जाणारे सर्व खवय्ये आनंदी आणि तृप्त होतात. सोबतच बाहेरून पुण्याला भेट देणार्या हौशी खवय्यांनासुद्धा हॅाटेल जगदंबने भुरळ घातली आहे.
तसेच या हॅाटेलमध्ये बसण्यासाठी अगदी प्रशस्त जागा, स्वच्छता, रुचकर जेवण आणि तुम्हाला हवे ते सर्व व्हेज-नॉनव्हेज पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात, तर आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत, कुटुंबासोबत किंवा पार्टी करण्यासाठी चवीष्ट, झणझणीत, तिखट नॉनव्हेज आणि व्हेज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॅाटेल जगदंबला भेट द्या.