शिंदे गटातील आमदाराच्या वाढदिवसाचा गुवाहाटीतून व्हिडीओ व्हायरल

मुंबई : गेल्या सहा सात दिवसांपासून महाराष्ट्रात भूकंप आल्याची देशभरात सगळीकडे चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. त्याचबरोबर राज्यभरात शिवसेना कार्यकर्ते बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलने आणि घोषणाबाजी करत आहेत. एकीकडे शिवसेनेची धाकधूक सुरु असताना दुसरीकडे गुवाहाटीतील बंडखोर आमदार उत्साहात वाढदिवस साजरा करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस गुवाहाटीमध्ये सर्व बंडखोर आमदारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. भोंडेकर हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूक निकालापासून भोंडेकर शिंदे गटात सहभागी झालेले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी ‘भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस आज गुवाहाटीमध्ये सर्व सहकारी आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.’ अशा प्रकारचं ट्विट करून वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Dnyaneshwar: