शिंदेंच्या बंडखोरीच्या तोफेत भाजपचाच दारूगोळा, हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. तसंच एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं आहे. यादरम्यान, गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले,  सुख दुःख आहे ते आपल्या सगळ्यांचं एकच आहे. मला तर एक नॅशनल पार्टी हवी आहे. जी महाशक्ती आहे. तुम्ही घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. आपल्याला कोणतीही कमी पडणार नाही. जी गरज लागेल ती सर्व पूर्ण केली जाईल, असं शिंदे म्हणाले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे हॉटेलमधील आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. यात ते भाजप आपल्या निर्णयाला काही कमी पडू देणार नाही, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय असे सांगताना दिसत आहे. त्यावर तानाजी सावंत यांनी साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे म्हणाताना दिसून येत आहेत. तसंच शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तसेच शिंदे जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल याला सर्व उपस्थित आमदारांनी हात वर करून अनुमोदन दिले आहे.

RashtraSanchar: