मुंबई : गेली आणि महिन्यापूर्वी रुपालीताई चाकरणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिला होता. आता त्या जागी माजी आमदार विद्या चव्हाण याची नियुक्त करण्यात येणार असल्याची माहित राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुपालीताईनी राजीनामा दिल्यानंतर हे पद खाली होतं यामुळे या पदावर आता विद्या चव्हाण यांची वर्णी लागली आहे.
तसंच गेल्या दोन वर्षांपासून राज्य महिला आयोगावर कोणीही वाली नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता सध्या त्या महिला आयोगाचा पदभार सांभाळत आहेत. तर नियुक्तीनंतर विद्या चव्हाण म्हणाल्या की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्हीं यावर सत्तात्याने आवाज उठवणार अहोत.