“निलेश राणेंना स्वतःची अक्कल नाही, वडिलांच्या जीवावर…”

मुंबई – Vidya Chavan on Neelesh Rane | राज्यसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

निलेश राणे आपल्या बापाच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत. अजित पवार हे दिवसरात्र काम करणारे नेते आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असं निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हणाले होते.

RashtraSanchar: