विद्या चव्हाण यांचं नवनीत राणांवर जोरदार टीका , म्हणाल्या …

मुंबई : गेल्या एक महिन्यापासुन खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणाचा करण्याचा चंगच बांधला आहे. राजद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा दाम्पत्यानं अटकन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला असून त्यांनी थेट दिल्ली गाठली. आता दिल्ली येथील एका हनुमान मंदिरात जाऊन ते महाआरती करणार आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्यानच्या या सगळ्यावरून प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी राणांवर वादग्रस्त शब्दांत टीका केली आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, “कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करत आहे, हे कितपत योग्य आहे? कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहित आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्यात. त्यांना एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे दाम्पत्य असा प्रकार करतंय.”अशी जोरदार टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.

तसंच अमरावतीत निवडणुकीच्या काळात मतदारांना कुकर वाटनारे रवी राणा हे सर्वांना माहीतच आहे. कुकर सोबत झाकण न देता मत मागायला जाणारे. त्यावेळी मत मिळवण्यासाठी मतदारांना आमिष दाखवत होते. असं ही विद्या चव्हाण म्हणाल्या त्यांच्या या जोरदार टीकेमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

Nilam: