गणेशोत्सवातही शिंदेंची शिवसेनेवर कुरघोडी, देखाव्याचे साहित्य केलं जप्त!

डोंबिवली : (Vijay Salavi On Shinde Government) शिवसेनेचा इतिहास हा त्याग आणि शौर्याचा आहे. सध्या शिवसेना आहे म्हणून आता नवा इतिहास घडणार आहे. शिवसेना ही कोणत्या नेत्याच्या जीवावर नसून ती शिवसैनिकांच्या बळावर ताठपणे उभी आहे. हे आपल्या गणेशोत्सव देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न कल्याण मधील विजय तरुण मंडळाने केला होता. यावर कोणतेही कारण नसताना पोलिसांनी आक्षेप घेत देखाव्यावर बुधवारी पहाटे कारवाई करत सामग्री जप्त केली.

दरम्यान, या कारवाईनंतर विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की, यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. पहाटेच्या सुमारास कारवाई करणे, ही हिटलरशही आहे. आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे सांगत शिंदे सरकार पोलिंसाना पुढे करुन गणेशोत्सवात देखील कुरघोडी करीत आहे असं ते म्हणाले.

विजय तरुण मंडळाचे यंदाचे 59 वे वर्ष आहे. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा देखावा साकारला आहे. राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. ही बाब कट्टर शिवसैनिकांना रुचली नसून आता गणपती मंडळाच्या देखाव्यातून शिवसेनेत झालेली बंडखोरी, मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

Prakash Harale: