“शरद पवारांना सोबत आणलं नाही तर अजित पवारांना…”, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Vijay Wadettiwar – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आता या भेटीवर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी विजय वडेट्टीवर म्हणाले की, “शरद पवार आणि अजित पवार यांचं काका-पुतण्याचं नातं आहे. त्यामुळे त्यांच्यात झालेल्या भेटीनंतर संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. या भेटीबाबत शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यामुळे थोडा धीर धरला पाहिजे.”

“जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवारांना सोबत घ्यावं लागेल. शरद पवार सोबत नाही आले तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नच बघत बसावं लागेल, असं कदाचित भाजपनं म्हटलं असू शकतं”, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Sumitra nalawade: