बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही खांद्यावर बसवून मिरवणूक काढू; व्हायरल व्हिडीओनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान

हिंगोली : (Vinayak Bhise On Santosh Bangar) “संतोष बांगर यांनी मिशी काढून यावं, आम्ही त्यांना खांद्यावर बसवून मिरवणूक काढू,” असं आव्हान हिंगोलीतील (Hingoli) ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांनी दिलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये (Kalamnuri Krushi Utpanna Bazar Samiti Election) 17 पैकी 17 जागा आमच्याच निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो, असं वक्तव्य आमदार बांगर यांनी केलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाकडून प्रतिआव्हान देण्यात आलं आहे.

कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल काल (1 मे) हाती आला. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. संतोष बांगर यांच्या पॅनलला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला आहे तर महविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) 12 जागांवर दणदणीत विजयी झाली आहे. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल त्यांच्याविरोधात गेला. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

या निकालानंतर आमदार संतोष बांगर यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार संतोष बांगर म्हणत आहेत की “कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून येतील, नाही आल्यास माझी मिशी काढून देतो.” यावर आता ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी बांगर यांना प्रतिआव्हान दिलं आहे. “तुम्ही मिशी काढून या, तुम्हाला खांद्यावर घेत मिरवणूक काढू. बांगर यांनी विधानसभेत निवडून येऊन दाखवावं आम्ही राजकारण सोडून देतो,” असं विनायक भिसे यांनी म्हटलं आहे.

Prakash Harale: