“बैठक नेमकं कोण चालवतंय?,” विचारताच विनायक राऊत नारायण राणेंमध्ये तू तू मैं मैं

सिंधुदुर्ग : (Vinayak Raut On Narayan Raut) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे हे नेहमीच विरोधकांवर आक्रमक वक्तव्याच्या फैरी डागत असतात. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून राणे कुटुंबाने आपला मोर्चा शिवसेना नेत्यांकडे वळवला आहे. त्यामुळे राणे-शिवसेना वादाचा नवा अंक सुरु झाल्यामुळे त्यांच्यातून विस्तवही जात नाही तोच आग लागायला सुरवात होते. राणे कुटुंबाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे नेटकऱ्यांकडून राणे कुटुंबावर टिकेची झोट उठवली जाते.

दरम्यान, आता नारायण राणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांच्यात झालेल्या तू तू मैं मैं चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नारायण राणेंसह त्यांचे दोन सुपूत्र निलेश आणि नितेश राणे यांची सोशल मीडियावर चर्चा होत असते. विरोधी पक्षांवर आणि नेत्यांवर हल्लाबोल करणे आणि राजकीय वर्तुळात विविध वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणे यामुळे राणे कुटूंब खास आकर्षणाचा विषय राहिलं आहे.

जेव्हापासून शिंदे सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून वेगळ्याच प्रकारचे राजकीय वातावरण दिसून येत आहे. याचा प्रत्यय नागरिकांनी, नेटकऱ्यांनी घेतला आहे. दसरा मेळाव्याच्या वेळी देखील हे दिसून आले होते. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये राणे आणि राऊत यांच्याती वाकयुद्धाचा प्रत्यय नेटकऱ्यांनी घेतला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जे झालं ते आता व्हायरल झालं आहे. त्यामुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Prakash Harale: