मोदींच्या सभेला फेरीवाल्यांना हजार रुपयांच्या बोलीवर आणलं, विनायक राऊतांची मोदींवर टीका

नाशिक | पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला ठाकरे गटाचे दिग्गज नेते अरविंद सावंत (Arvind Sawant), सुभाष देसाई (Subhash Desai), विनायक राऊत (Vinayak Raut) हे उपस्थित होते. यावेळी तीनही नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत यावे लागत आहे असे टीकास्त्र सोडले.

नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेला भाजपाने लोकांना फसवून आणलं होतं, मुंबईच्या (Mumbai) फेरीवाल्यांना फसवून मनपाच्या बसमधून आणून एक हजार रुपयांच्या बोलीवर सभेला बसवले होते. तर दुसरीकडे मोदींचे भाषण होत असताना अर्धी सभा गेलेली असेल. भाडोत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कमी पडले म्हणून पंतप्रधान यांना मुंबईत यावे लागले आहे, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान शड्डू ठोकून आले आहेत. अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. 

Dnyaneshwar: