Death Anniversary : मनोरंजन विश्वात 70च्या दशकांत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची जादू पसरलेली होती. तर, दुसरीकडे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील बॉलिवूड गाजवू लागले होते. याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याने मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आणि अवघ्या प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं. या अभिनेत्याचं नाव होतं विनोद खन्ना (Vinod Khanna).
मनोरंजन विश्वात खलनायक म्हणून एंट्री करणाऱ्या विनोद खन्ना यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारात मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं. विनोद खन्ना जेवढे गाजले तेवढ त्याचं वयक्तिक आयुष्य चर्चेत आलं. यश हात जोडून उभं असतानाच विनोद खन्ना यांनी बाॅलिवूडला राम राम ठोकला होता. ते रजनीश यांच्या आश्रमात जाऊन राहू लागले होते. जवळपास १० वर्ष ते डिप्रेशनमध्ये होते. साधू होऊन फिरायचे. त्यानंतर ते परत आले आणि काही चांगले सिनेमेही केले. त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते सेक्सबद्दल बोलताना दिसत आहेत.
विनोद खन्ना यांच्यात बॉलिवूडचे महानायक होण्याची क्षमता होती. मात्र संन्यास घेण्याच्या निर्णयामुळे करिअरचा आलेख काही महिन्यातच खाली उतरला गेला. काही वर्षांनंतर खन्ना यांनी पुन्हा काम करायला सुरुवात केली आणि आपल्या यशाचा आलेख उंचावला. 27 एप्रिल 2017 मध्ये मुंबईत त्यांचं निधन झालं.
विनोद खन्ना ह ओशोने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागले होते. 1982 मध्ये ते रजनीश आश्रमात जाऊन संन्यासी झाली. संन्यास घेण्याआधी ते तासन् तास ओशो यांचे व्हिडिओ पाहायचे आणि अनेकदा पुण्यातील त्यांच्या आश्रमातही जायचे. सोमवार ते शुक्रवार ते चित्रपटांचं चित्रीकरण करायचे तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते पुण्यातील ओशो आश्रमात सर्वसामान्य माणसासारखे घालवायचे.