मुंबई | Viral Video – आजकाल लोकं काय करतील याचा भरोसाच नाही. काही लोकं स्टंट करण्यात एक्सपर्ट असतात. तर काही लोकं त्यांच्या अतरंगी फॅशननं लोकांचं लक्ष वेधून घेतात. असेच अनेक मजेशीर व्हिडीओ आपण आत्तापर्यंत सोशल मीडियावर पाहिलेच असतील. तसंच आता एक तरूण चक्क पॅन्ट घालायचीच विसरला. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
मोहित गौहार या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक तरूण टाॅवेल गुंडाळून बनियनवर मेट्रोत प्रवास करतो. तसंच यावेळी त्याचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. हा मुलगा फुल्ल स्वॅगमध्ये केसाला भांग पाडताना दिसत आहे. मात्र, त्याचा हा अतरंगी स्वॅग पाहून मेट्रोतील प्रवाशांमध्ये एकच हशा पिकला.
सध्या या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन होत असून नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.