तब्बल १२०५ दिवसांनंतर कोहलीचं दमदार शतक! सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल; ‘या’ व्यक्तीला दिलं श्रेय

अहमदाबाद : (Virat Kohli celebrates century) अखेर विराट कोहलीने 1205 दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. त्याने 23 नोव्हेंबर 2019 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात कोहलीने आश्चर्यकारक कामगिरी केली.

अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्याच्या चौथ्या दिवशी (12 मार्च) विराटने कसोटीतील 28वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75वे शतक झळकावले. यानंतर त्यानी खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

कोहलीनं नेथन लायनच्या बॉलिंगवर फ्लिक करत एक धाव घेतली आणि त्यानंतर त्यांने अतिशय आरामात सेलिब्रेशन केलं. यापूर्वी विराट जेव्हा शतक झळकावायचा तेव्हा तो आनंदाने उड्या मारायचा. हवेत पंच मारायचा, पण आता तो तसं करत नाही. विराटने सर्वप्रथम हेल्मेट काढलं. मग हातातून ग्लोव्हज काढले. त्यानंतर कोहलीने आपल्या गळ्यातील साखळीतील अंगठी काढून प्रेक्षकांना दाखवली आणि तिचे चुंबन घेतले.

खरंतर कोहलीने लग्नाची अंगठी गळ्यातील साखळीत लॉकेटसारखी ठेवली आहे. जबरदस्त इनिंग खेळल्यानंतर तो त्या रिंगला किस करतो. असे केल्याने कोहलीने पत्नी अनुष्का शर्माची आठवण काढली आणि ती खेळी तिला समर्पित केली.

Prakash Harale: