आपल्या रूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने विराट कोहली संतापला

नवी दिल्ली (VIRAT KOHLI): भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे इतर खेळाडूंपेक्षा देशभरात सर्वाधिक फाॅलोवर्स आहेत. त्यामुळे त्याचे चाहते अनेकदा त्याच्या वैयक्तिक बाबींमध्ये झाकताना दिसतात. आज एक अशीच घटना घडली. विराट कोहली आणि भारतीय संघ सध्या टी २० वर्ल्डकप निमित्त ऑस्ट्रेलियात आहेत. दरम्यान, त्याठिकाणी विराट कोहली राहत असेलेल्या रूमचा आतला व्हिडीओ त्याच्या चाहत्याने काढून व्हायरल केला आहे. या घटनेने आपल्या वैयक्तिक जीवनात दखल दिल्याचे आपल्याला आवडले नसल्याचे म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.

विराट म्हणाला की, “मी समजू शकतो की, चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून आनंदी आणि उत्साही होतात. त्यांना भेटूनही खूप उत्साही होतो. मी नेहमीच त्यांचं कौतुक केलं आहे. पण हा व्हिडिओ भयभीत करणारा आहे. माझ्या गोपनीयतेची जराही कदर न केल्याने मला हे बिलकुल अवडलेलं नाहीये. माझ्या हॉटेलच्या खोलीत गोपनीयता आहे, अशा ठिकाणी जर घुसखोरी होत असेल तर मी इतर कोठेही सुरक्षित असण्याची अपेक्षा कशी करू शकतो? एखाद्याच्या गोपानियातेला मनोरंजनाचा विषय बनवू नका.” अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.

Dnyaneshwar: