“ऑस्ट्रेलियाचा किनारा सोडत आहोत, पण…”; पराभवानंतर विराट कोहली भावूक

नवी दिल्ली | Virat Kohli Reaction On T20 World Cup India Defeat – टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) सेमीफायनलमध्ये इंग्लडकडून भारताचा दारूण पराभव करण्यात आला. त्यामुळे टीम इंडिया टी-20 विश्वचषकामधून बाहेर पडली आहे. यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जरी आम्ही विश्वचषक जिंकलो नाही तरी येताना अनेक सकारात्मक गोष्टी व आठवणी घेऊन परत येत आहोत, असं कोहलीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

टी-20 विश्वचषक विराट कोहलीसाठी अत्यंत यशस्वी ठरला होता. चार अर्धशतकांसह 98.66 च्या जबरदस्त सरासरीनं 296 धावांसह कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तसंच यंदाचा टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी सर्वात यशस्वी ठरला होता. पण ऐन मोक्याच्या वेळी संघाची घडी विस्कटली आणि भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर विराटनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विराटनं ट्विट करत म्हटलं आहे की, “मनात निराशा व स्वप्नभंगाचं दु:ख घेऊन आम्ही ऑस्ट्रेलियाचा किनारा सोडत आहोत. पण माघारी येताना आम्ही अनेक आठवणी घेऊन निघालो आहोत. एक टीम म्हणून सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही इथून पुढे नव्यानं लढण्याची जिद्द घेऊन येत आहोत. आत्तापर्यंत दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्व चाहत्यांचे आभार. ही जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करताना खरोखरच नेहमी अभिमान वाटतो.”

Sumitra nalawade: