ट्विटरवर शाहरुख Vs विराट; दोन्ही सेलिब्रिटींचे चाहते भिडले, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | आयपीएल 2023 सुरू होण्याआधी असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. आयपीएलच्या 16व्या सीझनपूर्वी क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त ट्विटर वॉर रंगला आहे. दोघांच्या चाहत्यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. काहींनी विराट कोहलीला मोठा म्हटलं तर काहींनी शाहरुख खानचं कौतुक केलं आहे. तर कोणी विराट कोहलीच्या स्टारडम आणि इन्स्टाग्राम फॉलोअर्सचं उदाहरण देत त्याला शाहरुखपेक्षा मोठं म्हटलं जातंय. ट्विटरवर सुरू असलेल्या या ट्रेंडमध्ये काही चाहते वादग्रस्त ट्विटसुद्धा करत आहेत.

ट्विटरवर सुरू असलेल्या या वादादरम्यान काही लोक शांतीचं आवाहन करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. विराट कोहली आणि शाहरुख खान दोघंही या देशाचा अभिमान आहेत. हे दोघं आपल्या देशाचं जगभरात प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या क्षुल्लक वादाला इथेच थांबवा.’

शाहरुख खानच्या चाहत्याने लिहिलं, ‘शाहरुखची तुलना इतरांशी का केली जाते? शाहरुख विरोधात साऊथचे कलाकार, शाहरुखविरोधात राजकारणी, शाहरुख विरोधात क्रिकेटर्स. कारण सर्वांना माहितीये की तो सर्वोत्कृष्ट आहे.’ दुसरीकडे विराटच्या चाहत्याने लिहिलं, ‘शाहरुखचा सर्वाधिक लाइक केलेला ट्विट हा विराट कोहलीसंदर्भातील होता. त्यामुळे विराटच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.’

Dnyaneshwar: