नवी दिल्ली : (Virender Sehwag’s Post On Messi Fifa World Cup 2022) काल फिफा वर्ल्ड कप २०२२ फायनल (Fifa world cup final 2022) सामना पार पडला आणि मेस्सीच्या आर्जेन्टिना संघाने यात विजय मिळवला (argentina vs france). हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला होता. संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलें होत. मागील २ दिवसांपासून या सामन्याबद्दलच सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, फिफा वर्ल्डकप २०२२ हा आपला शेवटचा सामना असणार आहे असं मेस्सीनं जाहीर करत निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे मेस्सीच्या खेळीवर सर्वांचंच लक्ष होतं. (Virender Sehwag)
या सामन्यावर अनेक मिम्स देखील व्हायरल होताना दिसत होते. मेस्सी संबंधित देखील अनेक मिम्स इंटरनेटवर व्हायरल होत होते. दरम्यान, माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागच्या मेस्सी संबंधित शेअर केलेल्या पोस्टवर चांगलीच चर्चा होत आहे.
भारतात सरकारी नोकरीला खूप महत्व आहे. आणि देशात अनेकदा निवृत्त खेळाडूला एखादी सरकारी नोकरी प्रदान केली जाते. यावरूनच सेहवागने मेस्सीचा पोलिसाच्या वर्दीतला एक मिम शेअर केला आहे. त्यात ‘जर मेस्सी भारतीय असता तर वर्ल्डकप नंतर लेगेच…’ असं लिहिलें आहे. आणि कॅप्शनमध्ये हॅश – टॅग सरकारी नोकरी असंही लिहिलं आहे.