विशाखा सुभेदार साकारणार ‘या’ मालिकेत ‘विवाह सल्लागार’ हे पात्र

गेल्या अनेक दिवसांपासून स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने सर्वांना भुरळ घातली आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. त्यामधील मुख्य पात्र असणारे अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे संपूर्ण कानेटकर कुटुंब अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर या मालिकेमध्ये नवीन पात्राची एण्ट्री होणार असून त्यामध्ये सर्वांची लाडकी हस्यराणी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार ही विवाह सल्लागार या भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच विशाखाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून निरोप घेतला असुन ती आता वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच तिचे ‘कुर्रर्र’ या नाटकाला देखील प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. आता विशाखा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत दमयंती दुधखुळे नावाच्या विवाह सल्लागाराच पात्र करणार आहे.

दरम्यान, विशाखाला या पत्राबद्दल विचारल्यास ती म्हणाली की, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक वेगळी भूमिका साकारनार असून त्यातील छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे. दमयंती दुधखुळे या नावाप्रमाणेच हे पात्र विनोदी असेल याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार आनंद होत आहे. अप्पू-शशांकला एकत्र आणत असताना हे पात्र जगत असताना ती दमयंती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवत असल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मला हे पात्र साकारत असताना अनेक नवं-नवीन गोष्टी शिकता येणार असल्याचं विशाखा म्हणाली.

Nilam: