निरोगी आयुष्यासाठी ई जीवनसत्त्वयुक्त आहार

निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकस प्रथिने अन् जीवनसत्त्वाचे सेवन करणे गरजेचे असते. जीवनसत्त्वयुक्त आहाराचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून रोगट शरीराची मुक्ती होते. यातील काही जीवनसत्त्वे तर गंभीर आजारांवरही जालिम उपाय ठरतात. ई जीवनसत्त्व यांतीलच एक. वार्धक्य, वांझपणा यांसारख्या समस्यांवर ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आता परिणामकारक असल्याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील.

वारंवार होणारा गर्भपात, जन्मजात व्यंग टाळण्यासाठी मातेने टोकोफेराल (ई जीवनसत्त्व) सोबतच प्रथिने, कॅल्शियम, लोहयुक्त आहार सातत्याने प्रसूतीपर्यंत घेणे आवश्यक आहे, पुरुषांमध्ये असणारी कुपोषण, मानसिक ताण, अतिधूम्रपान यामुळे वीर्यजंतूंची संख्या कमी होणे अशा तक्रारींमध्ये ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आहार दिल्यास नक्कीच आवश्यक फरक जाणवतात.

मेनोपॉजमुळे मानसिक दडपण येते. हा काळ स्त्रियांचे मानसिक आरोग्य जपण्याचा असतो. ‘ई’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे असे त्रास होऊ शकतात. मेनोपॉजच्या काळात ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आहार दिल्यास मानसिक दडपण, झोप न लागणे असे त्रास होणार नाहीत.

वार्धक्य : ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आहार सौंदर्यात भर घालण्याचे काम करते, स्नायूंचे कार्य चांगले होण्यास याची मदत होते. तसेच हृदयविकारात रक्तवाहिन्यांमध्ये होणार्‍या गाठींचे प्रमाण ई जीवनसत्त्वयुक्त आहार यामुळे कमी होते व हार्ट अ‍ॅटॅकची शक्यता कमी होते. सोबतच हृदयाचे स्नायू बिघडण्याचे प्रमाण आणि जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्याने कमी होते. नियमित ई जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास हृदयविकाराचा झटका आला तरी तो प्राणघातक ठरणार नाही.

व्हेरिकोज व्हेन्स : ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे रक्ताच्या गाठी तयार होतात व त्या वाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढते, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी अडकून बसतात व रक्तप्रवाह थांबल्याने रक्तवाहिन्या फुटतात, अशा रोगांमध्ये ‘ई’ जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास रक्ताच्या गाठी विरघळण्यास मदत होते.

कशातून मिळते टोकोफेराल? (ई जीवनसत्त्व)
गव्हाचा कोंडा, सनफ्लॉवर, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन तेल, अंडी, लोणी, मोड आलेली कडधान्ये, गहू यांमध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. फळे, हिरव्या पालेभाज्या यामध्ये याचे प्रमाण कमी असते.
निरोगी आयुष्यासाठी ई जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक आजारांपासून रोगट शरीराची मुक्ती होते आणि संपूर्ण शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते.

Dnyaneshwar: