मुंबई | विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. कोणत्या विषयावर ते परखडपणे आपले मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचे काैतुकही करताना विवेक अग्निहोत्री हे दिसले. एका पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले की, पठाण चित्रपटाच्या यशासाठी मी शाहरूख खान याचे काैतुक करतो. कारण त्याने पठाण चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाचे फार काही प्रमोशन करताना शाहरूख खान हा दिसला नाही.
विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या निशाण्यावर दुसरे तिसरे कोणी नसून चक्क प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) आहेत. यावेळी त्यांनी चक्क प्रियंका गांधीवर टिका केलीये. इतकेच नाहीतर करण जोहर (Karan Johar) याच्या चित्रपटामध्ये काम करण्याचा सल्ला देखील दिला आहे. आता विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रियंका गांधीने दिल्लीत सत्याग्रहाला संबोधित केले होते.
विवेक अग्निहोत्री यांनी पोस्ट शेअर करत प्रियांका गांधी यांना निशाण्यावर धरले आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, परिवार… परिवार…परिवार…आपण काय केले आहे? तुम्हाला परिवारबद्दल इतके जास्त फेक प्रेम आहे…त्यामुळे मी तुम्हाला एक मोठा एक सल्ला देतो की, तुम्ही करण जोहर याच्या चित्रपटामध्ये काम करायला हवे…करण जोहर देखील अशाप्रकारच्या परिवारांवर आधारितच चित्रपट तयार करतो….तुम्ही करण जोहर यालाही बुडवाल…आता विवेक अग्निहोत्री यांची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.