“चार दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”

मुंबई – गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं आहे. आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या युतीमधून बाहेर पडायचं असल्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममध्ये असून उद्धव ठाकरेंकडे 17 ते 18 आमदार आहेत. मात्र अशातच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठा दावा केला आहे.

 येत्या दोन ते चार दिवसांत सगळे चित्र स्पष्ट होईल. गुवाहाटीला गेलेल्या काही अपक्ष आमदारांचे मलाही फोन आले. अनेक आमिषे, ऑफर देण्यात आल्या. मात्र, मी महाविकास आघाडीसोबतच आहे. ही बंडखोरी अधिक दिवस टिकणारी नाही. थोडे थांबा पुढील चार दिवसांत बंडखोर आमदार येऊन मातोश्रीवर पाय धरतील, असं भुयार म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची काही मते फुटली होती. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अपक्षांवर आरोप केले. यामध्ये देवेंद्र भुयार यांचे नाव होते. त्यानंतर भुयार यांनी राऊतांची भेटही घेतली होती.

RashtraSanchar: