रागावर नियंत्रण ठेवायचय?, वाचा ‘या’ काही सोप्प्या ट्रिक्स!

फेब्रुवारी पासून ते मे महिना पूर्ण संपला तरीही कडक उन्हाने सर्वजण त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. घरात कुलर, दोन -दोन फॅन जरी लावले तरीही गरमी ने फक्त आणि फक्त चिडचिड होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत उन्हाचा तडका जास्त प्रमाणात असतो. दुपारच कडाक्याच ऊन आणि त्यातून प्रत्येक व्यक्तीचे बदलत जाणारी मनस्तिथी. यावर सर्वजण आपापल्यापरीने उपाय करत आहेत. परंतु तरीही गरमी कमी होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. यामुळे चिडचिडपणा वाढत असल्याचं निदर्शनात आलं आहे.

यात अंगाला येणारा घाम आणि त्याचा दुर्गंध यामुळे आजून आपण चिडचिडपणा करू लागतो. आपल्याला आपल्या मनासारखी कोणतीच गोष्ट करता आली नाही तर पटकन राग येतो. यामध्ये अधिक गर्मीने चिडचिडपणा होत असतो. पूर्ण दिवस खरब जातो. तर आपण आपल्या परीने स्वता:कडे लक्ष देऊन आपल्या रागावर नियंत्रण कश्याप्रकारे ठेऊ शकतो आणि आपला सतत बदलत राहणारा मूड चांगला कसा ठेऊ शकतो याबद्दल या लेखात आपण पाहणार आहोत.

आपण आपल्या दररोजच्या दिनचर्येमध्ये काही बदल केले पाहिजे. चिडचिड होऊ नये यासाठी काही पदार्थांच सेवन करणे टाळले पाहिजे. यामध्ये अनेक वेळा आपण थकवा दूर करण्यासाठी कॉफीला प्राधान्य देत असतो. त्यामध्ये कॅफिन असल्याने ऊर्जा वाढते आणि रागाचा पारा वाढू शकतो. म्हणून गरमीमध्ये कॉफी घेणं टाळा. तसच मसालेदार पदार्थ घेण टाळा तसे पदार्थ शरीरातील गरमी वाढवते. यामुळे आपण योग्य आहार आणि भरपूर पाणी प्यावे. सकाळी लवकर उठून अनवाणी पायाने हिरव्या गवतावरून चाललं पाहिजे. दररोज थोडा वेळ स्वता:साठी काढला पाहिजे आपल्या आरोग्यावर आपण लक्ष दिले पाहिजे. यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहतो. चिडचिडपणा कमी होतो.

Nilam: