आलिया भट्टप्रमाणे स्वरा भास्करही लग्नापूर्वीच प्रेग्नन्ट? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधान

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने 6 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधल्याचे जाहिर केले. अगदी गुपचूप पद्धतीने स्वरा भास्कर हिने आपले लग्न उरकून घेतले आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत तिने आपली संपूर्ण लव्ह स्टोरी दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने लग्नातील काही फोटोही शेअर केले आहेत. तिने कोर्टामध्ये लग्न केले असून लग्न झाल्यानंतरचेही काही फोटो या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आता सोशल मीडियावर स्वरा भास्कर हिची पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत असून चाहते या पोस्टवर तिला लग्नाच्या शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत. दरम्यान स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या फोटोद्वारे स्वरा लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं सांगत आहेत. यासोबतच फोटोमध्ये स्वरा भास्करचा बेबी बंपही दिसत आहे. या फोटोमध्ये स्वरा भास्कर तिचा बेबी बंप तिच्या साडीमध्ये लपवताना दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. हा फोटो व्हायरल होताच स्वरा भास्कर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

सोशल मीडियावर लोकांनी स्वराच्या या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत आणि तिला या फोटोमागील सत्यदेखील विचारलं आहे. आता आलिया भट्टप्रमाणेच स्वरा लग्नापूर्वीच गरोदर असल्याने तिने घाईत लग्न उरकल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत स्वरा भास्करने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाहीय. त्याचबरोबर नेटकरी या फोटोवर सतत मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. तर तिच्या चाहत्यांनी या केवळ अफवा असल्याचं सांगत तिचा बचावही केला आहे. तर काहींनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Dnyaneshwar: