श्रीदेवी लग्नाआधीच होत्या प्रेग्नंट? बोनी कपूर यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “तिचे बेबी बंप दिसू लागले अन्…”

Sridevi | ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) या आज आपल्यात नसल्या तरी आजही त्या चर्चेत असतात. श्रीदेवींच्या चाहत्यांच्या मनात त्यांच्याशी संबंधित काही आठवणी आजही ताज्या आहेत. श्रीदेवींचे चित्रपट असो गाणी असो चाहते आजही तितक्याच आवडीनं पाहताना दिसतात. तर आता श्रीदेवी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण श्रीदेवी या लग्नाआधीच प्रेग्नंट (Pregnant) होत्या का? याबाबत स्वत: बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी खुलासा केला आहे.

नुकतीच बोनी कपूर यांनी युट्यूबर रोहन दुआला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. यावेळी बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर देखील भाष्य केलं. श्रीदेवी या लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं होतं. तर तब्बल 26 वर्षांनंतर बोनी कपूर यांनी याबबात खुलासा केला आहे.

श्रीदेवींच्या प्रेग्नंसीबाबत बोनी कपूर यांनी सांगितलं की, 2 जून 1996 मध्ये मी आणि श्रीदेवीनं गुपचून लग्न केलं होतं. हे माझं दुसरं लग्न होतं. त्यानंतर जानेवारीमध्ये श्रीदेवीचं बेबी बंप दिसू लागलं होतं. त्यामुळे श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती. तर श्रीदेवीचं बेबी बंप दिसू लागल्यानंतर आम्ही आमचं लग्न झाल्याचं जाहीर केलं.

आम्ही जानेवारी 1997 मध्ये थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा लग्न केलं. तर आम्ही पुन्हा एकदा लग्न केल्यामुळेच श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली होती. पण या सर्व अफवा होत्या. श्रीदेवी आमचं लग्न झाल्यानंतर प्रेग्नंट राहिली होती, असंही बोनी कपूर यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: