मुंबई | Hemangi Kavi – मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिची मतं सोशल मीडियावर बिनधास्तपे मांडताना दिसते. आताही हेमांगीनं एका मुलाखतीत तिच्या आई-बाबांच्या प्रायव्हेसीचा एक किस्सा सांगितला आहे. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
हेमांगीनं एका पाॅडकास्टमध्ये तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला आहे. या पाॅडकास्टमध्ये हेमांगीला ‘तुझ्यात हा फिअरलेस अप्रोच कसा आला?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “बोल्ड, बिनधास्त, निर्भीड असं मला कोणी म्हटलं की मला आश्चर्य वाटतं. मी ज्या गोष्टी बोलते त्या गोष्टी बोलायलाच पाहिजेत. मी निर्भीड असण्यामागचं कारण म्हणजे माझे बाबा. माझ्या बाबांनी माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये Gender Difference कधीच केला नाही.”
“टायटॅनिक, दयावान असे अनेक चित्रपट आम्ही एकत्र बसून बघितले आहेत. माझी आई सातवी पास आहे आणि माझे बाबा एलएलबी आहेत. आम्ही वन रूम किचनमध्ये राहत होतो. तेव्हा आई आणि बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिलेली आहे. त्यानंतर एकदा मी माझ्या ताईला प्रश्न विचारला की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा ताईनं माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली”, असंही हेमांगीनं सांगितलं.