नवी दिल्ली : Wedding Funny Video Viral – काळ जसा बदलला आहे तसं लग्नातील विविध परंपरांमध्येही बदल झाले आहेत. पूर्वी लग्नात वरमाळेचा कार्यक्रम फार जास्त प्रमाणात पहायला मिळत नसे. मात्र आजकाल याची एक फॅशनच झाली आहे. आता जवळपास सगळ्याच लग्नांमध्ये हा कार्यक्रम पाहायला मिळतो. वरमाळेच्या कार्यक्रमात नवरी आणि नवरदेव अतिशय आनंदाने एकमेकांना फुलांचे हार घालतात आणि नंतर एकमेकांना मिठाईही खाऊ घालतात. मात्र आता सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात नवरी आणि नवरदेव एकमेकांना जबरदस्ती मिठाई खाऊ घालताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान नवरीला अचानक राग येतो आणि यानंतर ती जे काही करते ते पाहून सगळेच थक्क होतात.
सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, तो अतिशय वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये वरमाळेच्या कार्यक्रमानंतर आधी नवरीने नवरदेवाला जबरदस्ती मिठाई खाऊ घातली आहे. यामुळे नवरदेव थोडा रागवला आणि त्यानेही नवरीला जबरदस्ती मिठाई खाऊ घालण्यास सुरुवात केली. मात्र या गोष्टीचा नवरीला इतका राग आला की तिने काहीही विचार न करता स्टेजवरच नवरदेवाला चापट मारली. नवरीचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले.
दरम्यान, हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 2.3 मिलियन म्हणजेच 23 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 22 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, दोघांचे 36 गुण जुळत आहेत. तर आणखी एकाने लिहिलं की हे कसलं लग्न आहे, ज्यात आतापासूनच ही परिस्थिती आहे.