अहमदनगर | PM Narendra Modi : आज (26 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची शिर्डीजवळील काकडी गावामध्ये भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवारांसमोरच (Ajit Pawar) शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केल? असं म्हणत मोदींनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर टीका केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेते होते जे 2014 च्या आधी अनेक वेळा राज्याचे कृषीमंत्री होऊन गेले. पण त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. शेतकऱ्यांसाठी कसलीच योजना काम करत नव्हती. त्यामुळे त्यांना सारखे हेलपाटे मारावे लागत होते. त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नाव फक्त राजकारणासाठी वापरण्यात आलं. मात्र, 2014 नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं आहे.
पुढे मोदींनी अजित पवारांसमोरच शरद पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेते आहेत ज्यांनी अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो पण सात वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. पण आपल्या सरकारनं सात वर्षांमध्ये साडेतीन लाख कोटी रूपयाच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं मोदींनी सांगितलं.