काय सांगता! ‘सरसेनापती हंबीरराव’चं तिकीट दाखवा अन् मिळवा ‘इतके’ डझन आंबे!

मुंबई | Sarsenapati Hambirrao Movie | काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दिग्दर्शक (Director) आणि अभिनेते (Actor) प्रवीण तरडे (Pravin Tarade) यांच्या ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmavir Mukkam Post Thane) या चित्रपटानं प्रदर्शित होताच बॅाक्स ऑफिसवर (Box Office) धूमाकुळ घातला. तसंच आता त्यांचा स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) यांच्या शौऱ्याला सलाम करणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट (Movie) प्रदर्शित (Release) झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठ्या संख्येनं गर्दी करताना दिसत आहेत. Sarsenapati Hambirrao Movie

एका इतिहास वेड्या प्रेक्षकानं ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनोखी ऑफर ठेवली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहून झाल्यानंतर या चित्रपटाचं तिकीट दाखवा आणि अर्धा डझन आंबे (Mango) मोफत मिळवा अशी ही ऑफर आहे. आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी ही नवीन आणि अनोखी कल्पना गीतांजली सोनसुरकर (Geetanjali Sonsurkar), तुषार सोनसुरकर (Tushar Sonsurkar) यांना सुचली असून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. तसंच सोनसुरकर यांनी चालु केलेली ही ऑफर प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.

२७ मे पासून सोनसुरकर यांनी ही ऑफर सुरू केली असून ३१ मे पर्यंत तुम्ही या चित्रपटाच्या तिकीटावर मोफत अर्धा डझन आंबे मिळवू शकता. मात्र हा चित्रपट पाहून झाल्यानंतरच ही तिकीटं तुम्ही या ऑफरसाठी दाखवू शकता. 10/1 मॉर्डन इमारत, जेबी रोड, कॉटन ग्रीन, मुंबई येथे तुम्ही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत तिकीट दाखवून अर्धा डझन आंबे घरी घेऊन येऊ शकता. तसंच इन्स्टाग्रामवर देखील त्यांचं फ्रेश ग्रीनी नावाचं अधिकृत अकाउंट आहे.

सोनसुरकर यांच्या रत्नागिरी येथील बागेतील हे फ्रेश आंबे आहेत. आपला इतिहास प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे तसेच आपल्या स्वराज्यातील प्रत्येक सरसेनापतीचं कतृत्व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला कळलं पाहिजे यासाठी सोनसुरकर यांनी ही ऑफर सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास ५० ते ६० लोकांनी या ऑफरचा लाभ घेतला आहे.

Sumitra nalawade: